मेट्रो मार्ग – ९ चे मेदेतीया नगर मेट्रो स्थानक हे तीन स्थरांचे (टियर्सचे) आहे, ज्यामध्ये पहिल्या स्थरावर वाहनांसाठी उड्डाणपूल असणार आहे, तर कॉन्कोर्स लेव्हल दुसऱ्या स्थरावर असेल आणि प्लॅटफॉर्म हे तिसऱ्या स्थरावर असणार आहे. या स्थानकाची एकूण उंची रस्त्याच्या पातळीपासून ३५ मीटर आहे. हे स्टेशन ६३.६३% पूर्ण झाले आहे, तसेच प्लॅटफॉर्म स्तरापर्यंत सर्व पीयर्ससह सर्व घटकांमध्ये कास्ट केले आहे, आता PPC उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या संरेखनातील सर्व स्थानकांचे काम 51% पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ९ ही मुंबई उपनगरांना मीरा-भाईंदर शहराला सोबत जोडणारी १०.०८ किमीची मार्गिका आहे ज्यामध्ये ८ उन्नत स्थानकांची समावेश असेल. या मेट्रो मार्ग ९ ही मेट्रो ७ चा उत्तरेकडील विस्तार आहे. ही मेट्रो मार्गिका इतर मेट्रो मार्गिकांपेक्षा वेगळी आहे, कारण या मेट्रो मार्गिकेत दोन आंतर बदल मेट्रो स्थानक असणार आहेत. पहिले आंतर बदल स्थानक हे दहिसर असेल जिथून मेट्रो मार्ग ७ साठी आणि मेट्रो मार्ग २ अ साठी आंतर बदल करता येईल आणि दुसरे स्थानक मिरागाव मेट्रो स्थानक हे असेल, जिथून मेट्रो मार्ग १० सोबत आंतर बदल करता येईल. यात वाहनांच्या वाहतुकीसाठी उड्डाणपूलासह ३ किमीचा डबल डेकर मेट्रो व्हायाडक्ट आहे. हे उड्डाण पूल विविध जंक्शन्सवरील रहदारी कमी करण्यासाठी बांधण्यात आले आहेत. पहिला उड्डाणपूल हाटकेश जंक्शन आणि सिल्व्हर पार्क जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला आहे, तर दुसरा उड्डाणपूल एस.के. स्टोन (नयानगर) जंक्शन आणि कनाकिया जंक्शन येथे रहदारी कमी करण्यासाठी बांधण्यात आला आहे, तसेच दीपक हॉस्पिटलजवळ तिसरा उड्डाणपूल असेल जो भाईंदर स्टेशनच्या दिशेने वाहतूक सुरळीत करेल तसेच काशिमिरा राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावरून मीरा-भाईंदरला थेट कनेक्ट करणारा कनेक्टर असेल. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ५० ते ७० टक्के वेळ वाचण्यास मदत होईल. तसेच दहिसर टोल प्लाझावरील सर्वात व्यस्त रहदारी टाळण्यासाठी प्रवाशांना दिलासा मिळेल.
“मुंबईतील विविध वाहतूक व्यवस्थांसोबत एकत्रीकरण करणे हा आव्हानात्मक भाग आहे कारण मुंबई कधीही थांबत नाही. मेट्रो मार्ग ९ ही मुंबई महानगर प्रदेशाच्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण असेल. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशामधील प्रवासाची पद्धत आणखीन सुधारेल” असे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले.
Join Our WhatsApp Community