कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राजकीय संन्यास; विधानसभेतील शेवटच्या भाषणात म्हणाले, अखेरच्या श्वासापर्यंत…

153

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुराप्पा यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी येडियुराप्पा यांनी विधानसभेत शेवटचे भाषण केले. यावेळी येडियुराप्पा म्हणाले की, ‘मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भाजपला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल. भाजप पुन्हा सत्तेत आणणे हे माझे एकमेव ध्येय आहे. आणि हे होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे.’ दरम्यान शुक्रवारी कर्नाटक विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता.

निरोपाच्या या भाषणात पुढे येडियुराप्पा म्हणाले की, ‘भाजपने मला बाजूला केल्याचे वक्तव्य बऱ्याच वेळेला विरोधकांनी केले होते. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, मी चार वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. इतक्या संधी इतर कोणत्याही नेत्याला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी सदैव ऋणी राहीन.’

८० वर्षीय बीएस येडियुराप्पा हे भाजपसाठी एक महत्त्वाचे नेते आहेत. लिंगायत समाजाचे सर्वात प्रभावशाली नेते म्हणून येडियुराप्पांना ओळखले जाते. येडियुराप्पा यांनी अटलबिहारी वाजपेयींपासून ते मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे शेवटच्या भाषणात त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत केलेल्या कामाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सहकारी आमदारांना शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता केली.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हाच आम्ही कायदेशीर लढाई जिंकली; शिवसेना आमदाराचे सूचक विधान)

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.