औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार…परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणे हेच खरे हिंदवी सुराज्य!, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांचे हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !
— Raj Thackeray (@RajThackeray) February 24, 2023
खरं तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पण यानंतर राज्यात सत्तांतर घडले. पुढे शिंदे-फडणवीस सरकारने उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावाला स्थगिती दिली. औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामकरण ‘धाराशिव’ करण्याचा नवा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अखेर आज या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
Join Our WhatsApp Community