मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यामध्ये शुक्रवारची रात्र काळ रात्र ठरली. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. एका भरधाव ट्रकने तीन बस गाड्यांना टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला. या तीनही बस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाला गेलेल्या लोकांना घेऊन परतत होत्या. दरम्यान, या अपघाताबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, अमित शाह यांच्यासह इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
असा झाला अपघात
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना त्यांच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख आणि जखमींना पाच लाख रुपये देण्याची मागणी केली आहे. रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास या तीन्ही बस मोहनिया टनेलजवळ आल्या असताना एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात दोन बस खाली दरीत कोसळल्या. तर एक बस रस्त्यावर पलटी झाली. बस गाड्यांना धडक देणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने या तीन बस गाड्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केले आहे.
(हेही वाचा आता औरंगाबादचे नामकरण प्रशासकीय पातळीवर कसे होणार? फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया )
Join Our WhatsApp Community