आता राज्यातील ‘या’ जिल्ह्याच्या नामांतराची होतेय मागणी

153

औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली. त्यामुळे आता राज्यातील इतरही ठिकाणचे नामकरणाची मागणी होऊ लागली आहे. त्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून आणखी एका जिल्ह्याच्या नामकरणाचा मागणी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत उस्मानाबाद जिल्ह्याचेही नामकरण करण्याची मागणी केली आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआचे सरकार कोसळण्याआधी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला अधिकृत पाया नव्हता म्हणून त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय घेतला आणि तो केंद्रात मंजुरीला पाठवला. केंद्राने शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी याला मंजुरी दिली. मात्र त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नामकरण केवळ शहराचे होणार कि जिल्ह्याचे असा प्रश्न उपस्थित करत संभ्रम निर्माण केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर नामकरण कसे होणार यांची प्रक्रिया सांगितली. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

(हेही वाचा आता औरंगाबादचे नामकरण प्रशासकीय पातळीवर कसे होणार? फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.