अटक होण्याची शक्यता
हसन मुश्रीफ यांनी कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र, यापुढे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता हसन मुश्रीफ यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाच्या आधारे ईडी हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलिसांच्या तक्रारीत हसन मुश्रीफ यांनी सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आणि संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या काही सभासदांनी याविरोधात शनिवारी मुरगुड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
(हेही वाचा आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत; नामांतराला विरोध करणाऱ्या AIMIM वर आमदार शिरसाट यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community