कसबा पोट निवडणुकीचा प्रचार बंद झाला असतानाही तेथील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी खोटे आरोप करत जे आंदोलन सुरु केले आहे, हा एक प्रकारे प्रचाराचाच प्रयत्न आहे, यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
कसबा येथे पराभव होणार हे दिसल्यावर तेथील उमेदवाराने हा प्रकार सुरु केला आहे, खरे तर निवडणुकीत पैसे वाटणे ही संस्कृती भाजपाची नसून ती काँग्रेस, राष्ट्रवादीची आहे, असेही फडणवीस म्हणाले. आपण कधीही सनसनाटी निर्माण करण्यासाठी बोलत नाही, तर आपण जे बोलतो त्याचे पुरावे आपल्याजवळ असतात, असेही फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर सांगितले. औरंगाबादचे नामांतर करण्यात आले आहे, ते सगळ्या जिल्ह्याचे केले आहे. त्याची प्रशासकीय प्रक्रिया लागलीच सुरु होईल. त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत, तालुका, जिल्हा आणि महानगर पालिका या सर्व ठिकाणचे नाव बदलण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर बनला राजकीय आखाडा)
Join Our WhatsApp Community