भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे ओवैसींकडेही जातील, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. शनिवारी नागपूर विमानतळावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
‘ज्या समाजावादी पक्षाने रामचरित मानस जाळले, त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंकडे गेलेत. आता खरंतर काय बोलावे उद्धव ठाकरेंना? आता कुठले हिंदुत्व राहिले? रामचरित मानस जाळतात ते उद्धव ठाकरेंचा सत्कार करतात. नंतर ते त्यांच्या युक्तीमध्ये जातात. काय बोलावे? उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे. मी १०० टक्के सांगतो, भाजपला विरोध करण्यासाठी ओवैसी जरी त्यांच्याकडे गेले नाही, तरी एमआयएमसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे ओवैसींकडे जातील. ठाकरेंची एवढी वाईट स्थिती होईल, याचा महाराष्ट्राने विचारही केला नव्हता,’ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच बावनकुळे पुढे म्हणाले की, ‘कसबा आणि चिंचवडमधील जनता भाजपच्या पाठिशी असल्यामुळे भाजपाचे उमेदवार जिंकणार आहेत. त्यामुळे मविआच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे उमेदवार उपोषण करत स्टंटबाजी करत आहेत. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याचा त्यांना काही फायदा होणार नाही.’
(हेही वाचा – ‘माझ्या फंद्यात पडून नका नाहीतर पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन’; नारायण राणेंचा अजित पवारांना…)
Join Our WhatsApp Community