अहमदनगर: गंगामाई साखर कारखान्यात भीषण आग, ८० जण अडकले

179

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच जवळपास ८० लोकं अडकले आहेत.

संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. इथेनॉलच्या प्रकल्पाला आग लागल्यानंतर बॉयलरला देखील आग लागली आहे. शिवाय येथे असलेल्या रसाच्या टाक्या देखील फुटल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे घटनेच्यावेळी कारखान्यात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. या घटनेची माहिती मिळाताच, अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण अग्नितांडवात किती नुकसान झाले? किती मनुष्यहानी झाली का? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण या  कारखान्यात १५० कामगार काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान पाथर्डी, शेवगाव, पैठण आणि अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब रवाना झाले आहेत. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

(हेही वाचा – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक; तीन जवान हुतात्मा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.