काँग्रेसच्या रायपूर येथील रविवारी झालेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बिनबुडाची टीका केली. बलवानांसमोर मान झुकवायची ही वीर सावरकरांची विचारधारा असल्याचे राहुल गांधी यावेळी विधान केले होते. राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप घेत, आता निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना तुमची मजबुरी होती, मात्र आताही तुम्ही शांत का?, असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे आणि आज पुन्हा वीर सावरकरांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. मागच्या काळात काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळे तुमची मजबुरी होती. तुम्हाला सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी रोज वीर सावरकरांचा अपमान करायचे. तरी तुम्ही मूग गिळून बसायचा. पण आता तुमची नेमकी मजबुरी काय आहे? आता तुम्ही ज्यांच्या गळाभेटी घेतात, ते रोज वीर सावरकरांचा अवमान करतायत. आज वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो.’
(हेही वाचा – राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ; वीर सावरकरांवर केली टीका)
Join Our WhatsApp Community