राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाद्वारे महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
( हेही वाचा : भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!)
- सीमा भागातील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना
- 75 हजार जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार असून राज्यात विविध क्षेत्रात भरती सुरू
- जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार
- मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना
- युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र
- पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल
- मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध होणार
- सरकारने मेट्रोच्या अनेक नव्या योजना हाती घेतल्या आहेत
- मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मेट्रो प्रकल्प
- आर्थिक सल्लागार समितीची घोषणा
- सी-लिंकचे काम तातडीने पूर्ण करणार
- सरकारने स्वातंत्र्य सैनिकांची पेंशन 10 हजारांवरून 20 हजारांपर्यंत वाढवली
- शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ९ मार्चला देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी एक दिवस म्हणजे ८ मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल. यंदाचा अर्थसंकल्प ६ लाख कोटी रुपयांचा असणार आहे.
Join Our WhatsApp Community