दिल्लीहून बिहारला जाणारी बस अनियंत्रित होऊन रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे यमुना एक्स्प्रेस-वेवर घडली.
( हेही वाचा : Maharashtra Budget Session : मिलिंद नार्वेकर चुकले, थेट आमदारांच्या आसनावर येऊन बसले…)
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस चालक दारूच्या नशेत होता. तो अतिवेगाने बस चालवत होता. त्यामुळे त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस यमुना एक्सप्रेसवेच्या दुभाजकाला धडकली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या 6 जणांना आग्रा येथे हलवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community