Maharashtra Budget Session: ‘तब्येतीपेक्षा मतदारसंघातील समस्या आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे’; वॉकर घेऊन भाजप आमदार विधानभवनात

133

शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मोठ्या अपघातातून बचावलेले भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) वॉकर घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात पोहोचलेत. तब्येतीपेक्षा मतदारसंघातील समस्या आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असल्यामुळे अधिवेशनाला आल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, ‘मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादाने नवजीवन मिळाले आहे. आता इथून पुढे मतदारसंघाच्या कामात, जिल्ह्याच्या आणि राज्यांच्या लोकांसाठी जे काही करता येईल ते करण्याचे प्रयत्न करणार आहे. मुळात गेल्या सहा महिन्यांपासून सरकारने खूप चांगले काम केले आहे. गेल्या अडीच वर्षात विकासाची जी कामे थांबली होती, ती वेगाने होताना दिसत आहेत. खास करून माझ्या मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाण्याचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, ते मागच्या काळखंडामध्ये पैसे असतानाही आघाडीने भाजपचा आमदार आहे म्हणून सगळी काम थांबवली होती. ती सगळी काम वेगाने चालू झाली आहेत.’

पुढे गोरे म्हणाले की, ‘सध्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परंतु मतदारसंघाचा विषय आहे, अधिवेशन काय पुन्हा पुन्हा नसते. जेवढी तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न सोडवता येतील, तेवढे सोडवू.’

(हेही वाचा – Maharashtra Budget Session : मिलिंद नार्वेकर चुकले, थेट आमदारांच्या आसनावर येऊन बसले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.