स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, पडघा या संस्थेने २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन टी. ए. पाटील इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये केले होते. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पडघ्यातील शारदा विद्यालय, टी. ए. पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल, आर. के. पालवी विद्यामंदिर तसेच अनगाव येथील लाहोटी विद्यालय या शाळांमधील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
( हेही वाचा : राष्ट्रवादीला मोठा धक्का! शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्याने दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा )
प्रमुख अतिथी म्हणून नवभारत इंग्लिश माध्यम स्कूलचे माजी मुख्याध्यापक रामदास पाटील, परीक्षक जयंत सोनटक्के व श्रीराम परांजपे, मुख्याध्यापक रामचंद्र थोरात, उपमुख्याध्यापिका ममता शेलार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा आगोवणे, जीवन प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पटेल उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शशांक तांबोळी यांनी जीवन विद्या प्रसारक शिक्षण मंडळ पडघाचे टी. ए. पाटील इंग्लिश स्कूलचा हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला होता.
या संस्थेचा मूळ उद्देश हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामतील योगदान, समाजसुधारक सावरकर, साहित्यिक सावरकर तसेच त्यांनी केलेला त्याग या त्यांच्या कार्याची जनजागृती व्हावी असा आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, पडघा आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
गट क्रमांक १ : इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक: कु. विधी गजानन कणसे इ. ५ वी द्वितीय क्रमांक: कु. प्राची भालचंद्र जाधव इ. ७ वी तृतीय क्रमांक: कु. माही विनोद शेलार इ. ६ वी (वरील सर्व टी. ए. पाटील इंग्लिश मिडीअम स्कूलचे विद्यार्थी)
गट क्रमांक २ : इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक: कु. आयान नासीर शेख इ. ९ वी (शारदा विद्यालय पडघा) द्वितीय क्रमांक: कु. लावण्या श्रीधर तेलवणे इ. ९ वी (टी. ए. पाटील पडघा) तृतीय क्रमांक: कु. तनिष्का तुकाराम उगलमुगले इ. ९ वी (लाहोटी विद्यालय आनगाव) उत्तेजनार्थ पारितोषिक: कु. जान्हवी राजेश पाटील इ. ८ वी (शारदा विद्यालय पडघा)
या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे श्रीराम परांजपे, मंदार कवठेकर आणि आनंदकुमार गुप्ता यांनी केले होते.
Join Our WhatsApp Community