माजी गृहराज्यमंत्री तथा भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. स्मारकातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचे पहिल्या दिवशीचे कामकाज स्थगित झाल्यानंतर प्रा. शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. स्मारकातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. तसेच वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कलाप्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात शिक्षा भोगलेल्या सेल्युलर जेलची प्रतिकृती, त्यांनी ओढलेला कोलू याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी किती मोठा संघर्ष केला, याची प्रचिती आली. त्यांना देशाप्रती किती अभिमान होता, त्यांनी त्या कालखंडात किती प्रखर लढा दिला, याची या स्मारकात आल्यानंतर जाणिव होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.
रायफल शुटींगचा अनुभव
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे चालविल्या जाणाऱ्या ‘रायफल शुटींग’ उपक्रमालाही प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. रायफल शुटिंगचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. वारंवार यावेसे वाटणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक हे मुंबईतील हक्काचे ठिकाण आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.
(हेही वाचा – वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने मुरबाडमधील मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा)
Join Our WhatsApp Community