स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे अंदमान येथे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम इंडिया काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. ज्यामध्ये डॉ. उमेश कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंग्रजांना भारत सोडण्यास मजबूर केले
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस: फ्रीडम स्ट्रगल एंड भारतीय नॅशनॅलिज्म’ याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले, ज्यांनी मातृभूमीसाठी योगदान दिले त्या व्यक्ती, संस्था आणि लेखकांना लोकांसमोर आणणे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यामागील उद्देश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आणि इंग्रजांना भारत सोडण्यास मजबूर केले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर या भारतमातेच्या दोन सुपुत्रांचे अंदमानाशी विशेष नाते आहे. वीर सावरकर यांनी मातृभूमीसाठी अंदमान जेलमध्ये यातना भोगल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच अंदमान द्वीप ब्रिटिश आणि जपानी सैन्याच्या विळख्यातून सोडवले आणि ३० डिसेंबर १९४३ रोजी या अंदमान द्वीपवर झेंडा फडकावला.
(हेही वाचा शतजन्म शोधिताना… समग्र सावरकर अनुभवताना सभागृह झाले सावरकरमय)
Join Our WhatsApp Community