निवडणूक आयोग बोगस आहे. त्याला निवडणूक चुना लगाओ आयोग का म्हणत नाही तेच कळत नाही. आमचा विश्वास उडालेला आहे. निवडणूक चुनाव आयोग नाही तर चुना लावणारा आयोग आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने जागर मराठी भाषेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली.
असे कधी घडले नव्हते. राम विलास पासवान यांच्या पक्षातसुद्धा असा वाद झालेला आहे. तिकडे त्यांनी जे केलेले आहे, किती वर्ष झाली वाद सुरु आहे. वाद सुरु असताना त्यांनी राम विलास पासवान यांच्या मुलाला एक चिन्ह दिलेले आहे आणि काकाला वेगळे चिन्ह दिले आहे. हे दोन्ही गट शांत का बसले आहेत, कारण हे दोन्ही गट भाजपसोबत आहेत. म्हणजे तुमच्या सोयीनुसार सगळे करणार असाल तर ही हुकूमशाही आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा मनीष सिसोदीयांच्या अटकेमुळे ‘आप’ला सेटबॅक; काय होणार परिणाम?)
या हुकूमशाही विरोधात एकजुट व्हायला लागली आहे. परवा अरविंद केजरीवाल आले होते, त्याआधी ममता बॅनर्जी आणि आणखी काही नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. हे महत्त्वाचे आहे. कारण आपले डोळे उघडले नाहीतर तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. आपल्याला ठरवायचे आहे. कारण कपिल सिब्बल काय बोलले ते महत्त्वाचे आहे. मी इथे जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी उभा नाही. तर मी देशातील संविधान वाचवण्यासाठी उभा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community