बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नसल्याचे प्रकार अनेक भागांतून समोर आले आहेत. याबाबत तातडीने एक बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
राज्यातील बारावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नाहीत; त्या पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणारे असतात. त्यांच्या उत्तर पत्रिका वेळेत तपासल्या गेल्या नाहीत तर निकालाला विलंब होईल. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती भाजप आमदार, वकील आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
याबाबत विधानसभा अध्यक्ष वकील, राहुल नार्वेकर यांनी दखल घेत हा विषय गंभीर असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे निर्देश दिले. सभागृहात शिक्षणमंत्री उपस्थितीत नव्हते, त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेतली. या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, शासन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2023: विधानसभेत विरोधकांचा गोंधळ; फडणवीस संतापले अन् म्हणाले, ‘..तर हक्कभंग आणावा’)
Join Our WhatsApp Community