सायबर सिकनेस! अतिरिक्त मोबाईल वापरल्याने येऊ शकते अपंगत्व

163

सायबर गुन्हे आणि आता तर सायबर आजार. इंटरनेटमुळे लोकांना बराच फायदा झाला, तसे नुकसानही झाले आहे. सायबर सिकनेस हा सध्या चर्चेत असलेला आजार आहे. सतत स्क्रीनचा वापर केल्याने हा आजार उद्भवतो. या आजारास सायबर मोशन सिकनेस किंवा डिजिटल वर्टिगो म्हणतात.

विशेष बाब म्हणजे आता ही अवस्था अगदीच सामान्य होत चालली आहे. अशी व्यक्ती जी दिवसभर मोबाईल किंवा कोणत्याही स्क्रीनसमोर सतत बसून असते, त्या व्यक्तीला हा आजार जडतो. या आजारात रुग्णाला चक्कर येत राहते. मस्तिष्क आणि शरीरात रक्त व ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या मज्जासंस्थेत बिघाड झाल्यामुळे हा त्रास सतावतो.

(हेही वाचा महापालिकेच्या विधी विभागातील या ५३ पदांची लवकरच भरती : लवकरच प्रसिध्द होणार जाहिरात)

फेनेला फॉक्स या महिलेला मोबाईलचं इतकं व्यसन जडलं की आता ती व्हिलचेअरवर असते. ती दिवसातून १४ – १४ तास स्क्रीनसमोर असायची, त्यामुळे डोकं आणि मानेचं दुखणं सतावू लागलं, ज्यामुळे चक्कर येणे आणि मळमळ ही समस्या निर्माण झाली. आता तिला अपंगत्व आलं आहे.

सतत स्क्रीन पाहिल्यामुळे सुरुवातीला मळमळ होऊ लागते. खूप सुगंध येऊ लागतो. असं होत असेल आणि तुम्हाला स्क्रीन पाहन्याची सवय असेल तर हे आजाराचं सुरुवातीचं लक्षण आहे असं समजा. त्यानंतर आणखी एक लक्षण म्हणजे चक्कर येणे. सतत एका जागी बसल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. डोळ्यांवर त्राण देखील निर्माण होतो, त्याचबरोबर डोकेदुखी ही समस्या देखील उद्भवते. त्यामुळे मोबाईलचं व्यसन जितक्या लवकर सोडला येईल तितक्या लवकर सोडा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.