ठाण्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवी परदेशी यांची हत्या

227

शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांच्यावर रविवारी रात्री जांभळी नाका येथे धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक तपासात समोर येत आहे.

जांभळीनाका ही बाजारपेठ ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ ओळखली जाते. या बाजारपेठेत शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांचा व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्यांचे दुकानाच्या कारणावरुन दोन फेरीवाल्यांसोबत वाद झाले होते. रविवारी रात्री 10 वाजता परदेशी हे रात्री घरी जात असताना दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

( हेही वाचा: विधीमंडळचा ‘चोरमंडळ’ असा उल्लेख; राज्य सरकार राऊतांविरोधात आणणार हक्कभंग? )

घटनेची माहिती मिळताच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, ठाण्यात फेरीवाल्यांच्या वादातून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. या हत्येनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.