ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राऊत यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करत असतानाच विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजप मात्र आक्रमक झालं आहे. भाजप आणि शिवसेनेने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, राज्य सरकार राऊतांच्या या विधानावर हक्कभंग आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
( हेही वाचा: संजय राऊतांना बसणार धक्का; गजानन कीर्तिकर संसदेच्या गटनेतेपदी येणार? )
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे आणि सरकारवर टीका करत असतानाच संजय राऊत म्हणाले की ही जी खोटी, नकली शिवसेना आहे ते एक चोर मंडळ आहे. हे विधीमंडळ नाही तर हे चोरमंडळ आहे. या शिवसेनेने आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत काय? अशी अनेक पदे आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. पदे ही आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली, पदे परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community