आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मोफत तत्वावर घेता यावे, त्यासाठी सर्व शिक्षा अभियान अर्थात Right to Education (RTE) ही योजना माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात सुरु केली. दुर्दैव असे की, या योजनेचा सर्वाधिक फायदा हिंदू समाजातील पालक घेताना दिसत नाही, त्यामुळे ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी सेवा समितीने दादरमधील साने गुरुजी विद्यामंदिरच्या सहकार्याने सर्व शिक्षा अभियानाच्या जनजागृतीची मोहीम सुरु केली.
प्रवेशप्रक्रियेसाठी मदत केंद्र
प्रत्येक पालकांना सर्वाधिक मानसिक त्रास असेल तर तो मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा न परवडणारा असतो. २०१६ ला ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी सेवा समितीने दादरमधील साने गुरुजी विद्यामंदिरच्या सहकार्याने सर्व शिक्षा अभियानाच्या जनजागृतीची मोहीम सुरु केली. तसेच त्याबाबत अधिक माहिती मिळावी म्हणून पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर व मोफत सर्व शिक्षा अभियानाचे अर्ज ऑनलाईन मोफत भरण्याचे केंद्र सुरु केले. पहिल्या वर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही त्रुटी आढळल्या, ज्यामुळे मुलांना प्रवेश मिळताना अडचण येत होती. त्यावेळी आम्ही थेट शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांना विनंती पत्र दिले, तसेच त्यावेळी काही वृत्त वहिन्यांनी हा विषय उचलून धरला. त्यानंतर काही प्रमाणात बदलदेखील झाला. गेली ८ वर्षे प्रतिवर्षी ह्या योजनेची माहिती अधिकाधिक हिंदू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती अभियान राबवत असून आज महाराष्ट्रातील बऱ्याच शहर व जिल्ह्यांमधून फोन येतात त्यांना आम्ही माहिती पत्र पाठवतो, तसेच त्याचा फायदाही आता हिंदूंना होत आहे. वेगवेगळ्या संस्था, शाळांसोबत आम्ही हे कार्यक्रम आयोजित करतो, असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जनार्दन पळ म्हणाले. या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो, तेव्हा त्यांना संबंधित शाळांना प्रवेश देणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाते, असेही पळ म्हणाले. संस्थेचे सचिव राज दुदवडकर, पदाधिकारी नितिन येंडे, ॲड भक्ती जोगल, भास्कर देवडीगा, प्रदिप शिंदे, प्रियांका पळ, मनोज म्हामुणकर, राजेश पवार ह्यांचे यासाठी खूप सहकार्य लाभते.
या प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क – प्रशांत पळ – 70210 98499.
(हेही वाचा रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात पुन्हा झाले सहभोजन; इतिहासाला मिळाला उजाळा)
Join Our WhatsApp Community