ठाकरे गटाने राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान यात्रा सुरू केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण अयोध्येतून आणून तो या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घेऊन जाणार आहे.
पक्ष आणि चिन्ह यांच्या वादात शिंदे गटाची सरशी झाली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आहे. मार्च अखेरीस अयोध्येत जाण्याबाबत शिवसेना शिंदे गटाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अयोध्येतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण’ असे या यात्रेचे घोषवाक्य असणार आहे.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2023: शिवसेनेने मागितला राऊतांचा राजीनामा)
Join Our WhatsApp Community