विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण; चार दिवसांनी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगासंदर्भात पत्र

159
संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण सुचले आहे. राऊतांवर कारवाई करीत असाल, तर एकनाथ शिंदेंवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत सभापतींना पत्र लिहिले आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊतांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे’, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याविरोधात शिवसेना-भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंग सूचना दाखल केली. विधानसभेत आमदार अतुल भातखळकर आणि विधानपरिषदेत आमदार राम शिंदे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापतींना यासंदर्भातील पत्र दिले.
यानंतर राऊतांवर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागल्याने विरोधी पक्षांनी विशेषतः उद्धवसेनेने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत हक्कभंग दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेच्या सभापतींकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसे पत्र सभापतींना पाठवले आहे.

दानवेंच्या पत्रात काय?

  • मी महाराष्ट्र विधानपरिषद नियम २४१ अन्वये महानगर मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यविरुद खालीलप्रमाणे विशेषाधिकारभंगाची सूचना देत आहे.
  • रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी विद्याथ्यांचे प्रत्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरून कारातला होता.
  • तदनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत देशापानले असे वक्तव्य केलेले आहे. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अश्या हीन भाषेचा वापर कल्यामुळे विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा व सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान झाला आहे.
  • उक्त प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे विरुद्ध भी हक्कभंगाचा प्रस्ताव देत आहे. कृपया हा प्रस्ताव स्वीकृत करून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधानपरिषद विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी आपणांस विनंती आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.