Maharashtra BJP: ‘महाविजय-२०२४’ अभियानासाठी भाजपाकडून संयोजन समितीची घोषणा

131
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने ‘महाविजय २०२४’ अभियान जाहीर केले आहे. या अभियानाची संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केली.
 
या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणून आमदार श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयोजन समितीच्या सदस्यपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, प्रदेश सचिव श्वेता शालिनी, अरविंद निलंगेकर, प्रदेश मुख्यालय सहसचिव संजय फांजे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘संपूर्ण विजय’ हे लक्ष्य ठेवून या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे या समितीचे विशेष निमंत्रित आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.