उत्तर ग्रीसमध्ये रेल्वे अपघात झाला आहे. शेकडो लोकांना घेऊन जाणा-या एक प्रवासी रेल्वेने समोरुन भरधाव वेगाने येणा-या मालवाहू रेल्वेला धडक दिली आहे. या अपघातानंतर रेल्वेचे अनेक डबे लोहमार्गावरुन घसरले आहेत. या दुर्दैवी अपघातात 32 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 85 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर रेल्वेची काही डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याबाबतची माहिती स्थानिक अधिका-याने दिली.
मंगळवारी मध्यरात्री उत्तर ग्रीसमधील टेम्पे शहराजवळ हा अपघात झाला. दोन रेल्वेची समोरासमोर धडक झाल्याने अनेक डबे रुळावरुन घसरले तर किमान तीन डब्यांना आग लागली. अपघाताची माहिती मिळताच बचाव दलाच्या कर्मचा-यांनी बुधवारी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम केले.
( हेही वाचा: हिंदू धर्माच्या संरक्षण आणि प्रचारासाठी आंध्रप्रदेश सरकार प्रत्येक गावात बांधणार मंदिर )
ग्रीक अग्निशमन दलाच्या एका अधिका-याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्याच्या घडीला 17 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 40 रुग्णवाहिका आणि किमान 150 अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत, अशी माहिती ग्रीक अग्निशमन दलाचे प्रवक्ते वॅसिलिस वार्थगियानिस यांनी दिली.
Join Our WhatsApp Community