पोलीस चलानसह वाहनांचा ऑन द स्पाॅट विमाही काढणार; केंद्र सरकार करणार मोटार वाहन विमा नियमांमध्ये बदल?

157

देशातील महामार्गांवर धावणा-या वाहनांपैकी तब्बल 50 टक्के वाहने थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय धावत आहेत. आता केंद्र सरकार या विमा नसलेल्या वाहनांसाठी ऑन द स्पाॅट विमा काढण्याची तयारी करत आहे.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार, वाहतूक पोलीस विमा नसलेली वाहने जेव्हा पकडतील, तेव्हा त्यांच्या चालानसह वाहनांचा ऑन द स्पाॅट थर्ड पार्टी विमाही काढला जाईल. वाहन मालकाच्या फास्टॅग खात्यातून विमा प्रिमियमची रक्कम कापली जाईल. त्यामुळे बेजबाबदार वाहनधारकांना एकाच वेळी दोन दणके बसणार आहेत.

अॅपवरुन माहिती काढणार

  • सरकार अशी एक प्रणाली बनवत आहे. ज्याअंतर्गत पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी महामार्ग मंत्रालयाच्या वाहन अॅपच्या मदतीने हातातील उपकरणातून वाहनांची संपूर्ण माहिती काढतील.
  • जर वाहनाचा विमा उतरवला नसेल तर परिवहन विभागाच्या नेटवर्कशी जोडलेल्या सामान्य विमा कंपन्यांकडून लगेच पाॅलिसी खरेदी करण्याचा पर्याय असेल.

बॅंक- विमा कंपन्याही फास्टॅग प्लॅटफाॅर्मवर

  • फास्टॅग शिल्लकमधून विमा प्रीमियम वजा करुन ऑन द स्पाॅट मोटार विमा पाॅलिसींसाठी त्वरित प्रीमियम भरण्यासाठी बॅंकांना तसेच विमा कंपन्यांना फास्टॅग प्लॅटफाॅर्मवर आणले जाऊ शकते.
  • जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या एका अधिका-याने सांगितले की, कौन्सिलच्या बैठकीत स्पाॅट इन्शुरन्सवरही चर्चा झाली. आता त्याच्या अंमलबजावणीसाठी शिफारशी तयार केल्या जात आहेत. 17 मार्चच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.