नवाब मलिक देशद्रोही, अंबादास दानवे तुमच्या पक्षाचे त्याला समर्थन आहे का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

236
नवाब मलिक देशद्रोही आहे. अशा देशद्रोह्याविरोधात बोलणे हा गुन्हा असेल, तर मी असा गुन्हा ५० वेळा करायला तयार आहे. पण अंबादास दानवे, देशद्रोही नवाब मलिकला तुमच्या पक्षाचे समर्थन आहे का, असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार तोफ  डागली.
विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंग सुचनेवर खुलासा करताना ते विधानपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, देशद्रोहासंदर्भात जे माझे वक्तव्य आहे ते अजित पवार किंवा इतर आमदारांबद्दल नव्हते. नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री होते. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन, हसीना पारकर या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या देशद्रोह्यांकडील जमीन/ गाळे नवाब मलिक यांनी घेतली. त्यामुळे मी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणालो. कारण त्यांनी देशद्रोही व्यक्तींबरोबर व्यवहार केला.

….म्हणूनच आम्ही ठाकरेंना सोडले

तरीही तत्कालीन सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. उलट पाठिंबा दिला. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना पाठिंबा देणाऱ्यांबरोबर आम्ही चहापान केले नाही ते बरे झाले, असे मी म्हणालो. संजय राठोडचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिकचा का नाही, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. याच देशद्रोह्यांना पाठिंबा म्हणूनच आम्ही त्यांना सोडले, असा पलटवारही त्यांनी केला
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.