रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान होळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त होळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आधीच १०५ होळी विशेष ट्रेन सेवा चालवण्याची घोषणा केली आहे. त्या व्यतिरिक्त २६ विशेष ट्रेन सेवा चालवल्या जाणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली असून या अतिरिक्त विशेषसह यंदाच्या होळी विशेषची एकूण संख्या १३१ एवढी झाली आहे. या विशेष होळी गाड्या चिपळूण, रोहा, कणकवली, सावंतवाडी मार्गे धावणार आहेत.
( हेही वाचा : भाजपने टिळक आणि पर्रीकरांचा वापर करून फेकले – उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल )
मुंबई – करमळी वातानुकूलित होळी विशेष (४ सेवा)
- 01187 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २.३.२०२३ आणि ९.३.२०२३ रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.
- 01188 विशेष गाडी ३.३.२०२३ आणि १०.३.२०२३ रोजी करमळी येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि.
- डब्याची रचना :एक प्रथम वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन.
मुंबई – मंगळुरु वातानुकूलित होळी विशेष (२ सेवा)
- 01165 वातानुकूलित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७.३.२०२३ रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता पोहोचेल.
- 01166 वातानुकूलित विशेष मंगळुरु जंक्शन दि. ८.३.२०२३ रोजी १८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.
- थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल आणि ठोकूर.
- डब्याची रचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन.
रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू
- 01597 मेमू ट्रेन रोहा येथून ४.३.२०२३ ते १२.३.२०२३ (९ सेवा) पर्यंत दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.
- 01598 मेमू चिपळूण येथून ४.३.२०२३ ते १२.३.२०२३ (९ सेवा) दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
- थांबे: माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड.
- डब्याची रचना : १२ कार मेमू
मुंबई- वाराणसी होळी विशेष (२ सेवा)
- 01467 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०४.०३.२०२३ रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल.
- 01468 सुपरफास्ट विशेष ५.३.२०२३ रोजी १८.१० वाजता बनारस येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल.
- थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी.
- डब्याची संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण कसे कराल:
विशेष गाडी क्र. 01467, 01165/01166 आणि 01187/01188 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू झालेले आहे.
Join Our WhatsApp Community