सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC अंतर्गत भरती, असा करा अर्ज

197

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ पदाच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जप्रक्रिया 2 मार्च 2023 पासून सुरु झालेली आहे, तर शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.

( हेही वाचा : महानगरपालिकेची महिलांना अनोखी भेट ! स्विमिंगच्या शुल्कात २५ टक्के सवलत)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा
  • पदसंख्या – 673 जागा
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    अराखीव (खुला) – रु. 394/-
    मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 मार्च 2023
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

पदसंख्या

  • सामान्य प्रशासन विभाग – २९५ पदे
  • पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग – १३० पदे
  • सार्वजनिक बांधकाम विभाग – १५ पदे
  • अन्न व नागरी विभाग – ३९ पदे
  • वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – १९४ पदे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.