देशातील पर्यटनाचा प्रचार मिशन मोडवर! पंतप्रधान मोदी घेणार विशेष वेबिनार

148
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता दूरदृश्य प्रणालीव्दारे ‘डेव्हलपिंग टुरिझम इन मिशन मोड’ अर्थात “मिशन मोडवर पर्यटन विकास” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला मार्गदर्शन करणार आहेत.

( हेही वाचा : महानगरपालिकेची महिलांना अनोखी भेट ! स्विमिंगच्या शुल्कात २५ टक्के सवलत )

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संकल्पना आणि सूचना प्राप्त करण्यासाठी सरकारद्वारे आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेचा हा एक भाग आहे. राज्यांचा सक्रिय सहभाग, सरकारी कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पर्यटनाचा प्रचार मिशन मोडवर केला जाईल असे केंद्रीय अर्थसंकल्पात म्हटले आहे. यासाठी किमान 50 स्थळे निवडण्यात येणार आहेत. ‘देखो अपना देश’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील विशिष्टपूर्ण कौशल्य आणि उद्योजकता विकासाचा समावेश केला जाईल.

अर्थसंकल्पोत्तर वेबिनार पर्यटन मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात येत असून त्यात सहा महत्वपूर्ण सत्रे असतील ज्यात केंद्रीय अर्थसंकल्पात निवडण्यात आलेल्या प्राधान्य क्षेत्रांचा समावेश असेल. संबंधित केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे मंत्री आणि सचिवांव्यतिरिक्त, प्रवास आणि उद्योग हितधारकांकडून निवडलेले हितधारक, पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विद्यार्थी, आघाडीचे उद्योगपती, पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत शैक्षणिक संस्था, फिक्की आणि सीआयआय सारख्या संस्था तसेच प्रमुख पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग संघटना या वेबिनारमध्ये उपस्थित राहतील आणि पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय घोषणांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचना आणि संकल्पनांद्वारे योगदान देतील.

पर्यटन विकासासाठी स्थळ केंद्रित दृष्टिकोन, अभिसरण – सहयोगाचे सामर्थ्य, पर्यटन क्षेत्रातील सार्वजनिक खासगी सहभाग बळकट करणे, पर्यटन क्षेत्रात नवोन्मेष आणि डिजिटलायझेशनचा अंतर्भाव, पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा याद्वारे तळागाळातील जीवनावर प्रभाव टाकणे या महत्वपूर्ण संकल्पना आहेत.

वेबिनारचे थेट प्रक्षेपण केले जाईल आणि https://youtube.com/live/cOYm5okQjp0?feature=share यावर कार्यक्रम पाहता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.