हल्ल्यामागे कोण? संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

144

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादर, शिवाजी पार्क येथे मार्निंग वाॅक करत असताना प्राणघातक हल्ला झाला. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर राॅड आणि स्टम्पने हल्ला केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या हाता पायाला मार लागला आहे. हिंदुजा रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले, यावेळी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना त्यांनी मी कोणालाही घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले देशपांडे?

आम्ही कोणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. आम्ही कोणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे. अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझे काम करत राहीन. ज्यांना वाटते मी या हल्ल्याने घाबरेन त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही, असे देशापांडे म्हणाले.

( हेही वाचा: तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा – संजय राऊत )

अज्ञातांकडून संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

संदीप देशपांडे माॅर्निंग वाॅकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा मास्क घातलेल्या 4 अज्ञातांनी त्यांच्यावर स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.