महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी, सकाळी मॉर्निंग वॉकला छत्रपती शिवाजी पार्क परिसरात गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. माहितीनुसार, चार ते पाच अज्ञातांनी स्टम्प आणि लोखंडी रॉडनं देशपांडेवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. यादरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देशपांडेंच्या हल्ल्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सर्वसामान्यांचं सरकार आहे, मुख्यमंत्री देखील सर्वसामान्यांचे आहेत, असं म्हणतात. त्याच हेतूनं अजित पवारांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.
देशपांडेंना मिळाला डिस्चार्ज
संदीप देशपांडेवर हल्ल्या झाल्यानंतर त्यांना तातडीनं दादर येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. या हल्ल्यात देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसंच देशपांडेंना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
(हेही वाचा – तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा – संजय राऊत)
Join Our WhatsApp Community