मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेच्या अनेक पदाधिका-यांनी हल्लेखोरांना मनसे स्टाईलने उत्तर देण्याचे म्हटले आहे. त्यातच आता संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यामागे राऊत आणि आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी दादर शिवाजी पार्क येथे माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते. त्यावेळी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. देशपांडे नेहमीच अनेक विषयांवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. त्याचाच राग मनात ठेवून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलिसांनी देशपांडे यांचा जबाब नोंदवला आहे. हल्ल्यानंतर पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले जाते.
( हेही वाचा: हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी राऊतांकडे फक्त काही तास)
संदीप देशपांडे हे मनसेचे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचे काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयीदेखील झाले. 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेमध्ये आहेत.
Join Our WhatsApp Community