सत्तेत येताच काय केले, याची जंत्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वाचली. सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आली, त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असले तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगले म्हणण्याचे विरोधकांचे काम आहे, तुमचे मोती बिंदूचे ऑपरेशन करावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.
निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही
आमचे सरकार सकारात्मक निर्णय घेते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा नागरिकांना लाभ होत आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचा शुभारंभ केला. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा फायदा घेतला. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर असल्याचेही त्यांनी सांगितले. अभिभाषणावर बोलाल अशी अपेक्षा होती. विरोधकांनी विरोधकासारखे बोलले पाहिजे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. आम्ही जे काम करतो ते तुम्हाला दिसत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमच्या विरोधात घोषणा देण्यासाठी पुतळे जाळण्याकरता लोकांना १० वेळा परवानग्या घ्याव्या लागल्या, कारण आम्हीच खरी शिवसेना आहे. लोकांनी आम्हाला पसंत केले आहे, म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत. निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. अजित पवार तुम्ही गोड बोलतात, पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील, त्यामुळे जालीम औषध शोधून ठेवले आहे. अडीच वर्षांमध्ये सगळे प्रकल्प थांबले होते. तुम्ही सुद्धा होता तिथे, पुढील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. महाराष्ट्रापुढे नवीन चित्र निर्माण करणार आहे. या राज्यातील इन्फ्रा प्रकल्प सादर करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.
(हेही वाचा कसबा निवडणूक! केवळ मोदींवर अवलंबून कसं चालेल?)
Join Our WhatsApp Community