वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील नेपियन्सी मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग तसेच मुंबई सेंट्रल स्थित बी.आय.टी. वसाहत या तीन ठिकाणच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या तीन परिसरात मिळून अंदाजे २०० इमारती आहेत. या गृहनिर्माण संस्था (सोसायटी)/इमारतींमधून दररोज अंदाजे १० मेट्रिक टन कचरा क्षेपणभूमीला वाहून नेला जातो. हा सर्व कचरा ओला आणि सुका अशा रितीने उगमस्थळीच वर्गीकरण करुनच संकलित करण्याचे प्रयत्न मागील आठ दिवसांपासून सुरु करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु हा प्रयत्न काही वर्षांपूर्वी तत्कालिन सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या कारकिर्दीत सुरु झाला होता आणि त्यांची बदली झाल्यानंतर बंद झालेली मोहीम पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्यावतीने महत्त्वाच्या तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शंभर टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यास मागील आठ दिवसांपासून प्रारंभ केला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या प्रयोगामधून मिळणाऱ्या या निकषांच्या आधारे योग्य ते बदल / सुधारणा करुन संपूर्ण विभागामध्ये ही मोहीम सुरु करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महानगरपालिकेचा डी विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रामध्ये दररोज कमीत कमी कचरा निर्माण व्हावा, यासाठी उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यादृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना विभाग स्तरावर करण्यात येत आहेत.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
त्यापैकी वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील नेपियन्सी मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग तसेच मुंबई सेंट्रल स्थित बी.आय.टी. वसाहत या तीन ठिकाणच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या तीन परिसरात मिळून अंदाजे २०० इमारती आहेत. या गृहनिर्माण संस्था (सोसायटी) / इमारतींमधून दररोज अंदाजे १० मेट्रिक टन कचरा क्षेपणभूमीला वाहून नेला जातो. हा सर्व कचरा ओला आणि सुका अशा रितीने उगमस्थळीच वर्गीकरण करुनच संकलित करण्याचे प्रयत्न मागील आठ दिवसांपासून सुरु करण्यात आले आहेत. त्यास यश देखील येवू लागले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
त्यासाठी या तीनही ठिकाणी असलेल्या सर्व इमारतींना ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व सोसायटींना कचरा वर्गीकरण करणे सक्तीचे केले आहे. वर्गीकरण केलेला हा कचरा उचलण्यासाठी ओला कचरा संकलन वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळावा, यासाठी परिसरांमध्ये पथनाट्य, रॅली, चित्ररथ यांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, ज्या इमारती / सोसायटी कचरा वर्गीकरण करणार नाहीत, त्यांचेवर महानगरपालिकेच्या प्रचलित नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असा इशारा सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे सर्वात प्रथम उगमस्थानी कचऱ्याची वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची पहिली मोहिम याच विभागातून तत्कालिन सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या कारकिर्दीत सुरु झाली होती. त्यामुळे अशाप्रकारे ओल्या व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांना मालमत्ता करात सवलतही देण्याचा मान या विभागाने मिळवला आहे. या विभागात खासगी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या गोळा करून त्यांची विल्हेवाट गुजरात येथे नेऊन केला जात होता. यामध्ये शाळकरी मुलांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून कचऱ्यासह प्लास्टिक बाबतची जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा डी विभागात या बंद झालेल्या मोहीम सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवरायांचे मावळे पुन्हा आझाद मैदानात एकवटले)
Join Our WhatsApp Community