शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचा शुक्रवार, ३ मार्च रोजी मृत्यू झाला. ते डोंबिवलीत राहात होते. पण धक्कादायक म्हणजे एका रुग्णालयातुन दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स रस्त्यातच बंद पडल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाही, अन्यथा त्यांचा जीव वाचू शकला असता असा आरोप देसाई यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
सूर्यकांत देसाई हे 1995 ते 2000 या काळात परळ लालबाग विधानसभा मदारसंघातील आमदार होते. गेली 22 वर्ष ते डोंबिवलीत राहत होते त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्रास आणखी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देण्यात आला. पण ज्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथे व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती.
(हेही वाचा परीक्षेला हिजाब घालून बसण्यास परवानगी देण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)
त्यामुळे देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यासाठी अॅम्ब्यूलन्स बोलावली. पण दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चक्क धक्का मारत अॅम्ब्यूलन्स अर्ध्या किलोमीटरपर्यंत पुढे नेली. त्यानंतर तिथे दुसरी एक रुग्णवाहिका बोलवून त्यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या रुग्णवाहिक विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं देसाई यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community