संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर; दोन जण ताब्यात

139

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी माॅर्निंग वाॅक करतेवेळी शिवाजी पार्क परिसरात स्टॅम आणि राॅडने हल्ला करण्यात आला. ज्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला ते चौघेही सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही हल्लेखोर हे भांडूप येथे राहणारे आहेत.

या हल्ल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिले.

( हेही वाचा: राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; चीनचे कौतुक आणि काश्मीरबाबतही केले चुकीचे विधान )

देशपांडे जबाबात काय म्हणाले?

संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला केला. त्यावेळी तीन-चार तरुणांनी स्टंप आणि बॅटने मारहाण केली. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर बॅट मारण्याचा प्रयत्न केला.

देशपांडे पुढील म्हणाले की, हल्लेखोरांकडून शिवीगाळ करण्यात आली. ठाकरेंना नडतोस? वरुणला नडतोस? पत्र लिहितोस, असे हल्लेखोरांनी मला म्हटले. या मारहाणीतून वाचवण्यासाठी काही नागरिक येत असताना त्यांनाही धमकावण्यात आले. त्यानंतर हल्लेखोर राजा बडे चौकाच्या दिशेने पळून गेले असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. हल्लेखोर निघून गेल्यानंतर मित्रांनी तातडीने मला  उपचारासाठी हिंदुजा रुग्णालायात दाखल केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.