२०२४ च्या आधीच तिसऱ्या आघाडीला धक्का; ममता बॅनर्जींचा ‘एकाला चलो’ चा नारा

223
२०१९मध्ये पहिल्यांदा शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी देशभरात काँग्रेसशिवाय आणि भाजप विरोधी सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला.  मात्र  तो सपशेल फेल ठरला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत बराच जोर लावला, पण भाजप ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर ठेवू शकले नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी वेगळा विचार करत आहेत. पश्चिम बंगालमधील सर्वांच्या सर्व जागा त्या एकट्याने लढण्याच्या विचारात आहेत.

सागरदिघी विधानसभा मतदारसंघातील पराभवामुळे बदल

गेल्या काही महिन्यांपासून देशात भाजपाविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, जदयू अशा अनेक विरोधी पक्षांनी यासंदर्भात इच्छुक असल्याची विधाने वेळोवेळी केली होती. त्यामुळे २०२४च्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विरोधी पक्षांच्या या प्रयत्नांना मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. सत्तेत असूनही ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे विरोधकांनी त्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.