मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र त्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची खिल्ली उडवणारी पोस्ट ट्विटरवर व्हायरल केली. त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी ट्विटमध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर झोपला असून स्वतःच्या हातात बूट घालून तो बूट स्वतःच्याच गालावर ठेवत ‘जाहीर निषेध’ असे त्यात म्हटले आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध !! pic.twitter.com/rWBwD4uD7Z
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) March 3, 2023
त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिल्लीत एका व्यक्तीने सणसणीत कानाखाली मारली होती, त्याचा व्हिडिओ पोस्ट करत आता याचा निषेध कोण करणार, असा खोचक सवाल केला आहे.
ह्याचा पण जाहीर निषेध बर.. pic.twitter.com/unQVAUxFIM
— Amitbajaj (@BajajBjp) March 3, 2023
तर काही जणांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता, तेव्हा पवारांचा नेतृत्वाखालील ठाकरे सरकारने महामंडळाच्या विलीनीकरणाच्या विषयाला नाकारले म्हणून संपकरी कामगारांनी पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे आझाद मैदान येथून मोर्चा काढला होता, ज्यावेळी कामगारांनी निषेध म्हणून सिल्व्हर ओकमध्ये चपला फेकल्या होत्या, त्याचीहो नेटकर्यांनीं निधड केला होता, याची आठवण करून दिली.
(हेही वाचा आता कपिल सिब्बल तिसऱ्या आघाडीसाठी घेणार पुढाकार; काय आहे अजेंडा?)
जाहीर म्हणजे जाहीर निषेध..
🏹🏹🏹😂😂😂😂😂 pic.twitter.com/dyqT1jT6LB— कर्ण (@angarajkarna) March 3, 2023
काकांचे कसे कान फोडले होते, पार मेंदूला झिणझिण्या आलेल्या काकांच्या, माहिती आहे ना सुरजा😂🤣😂🤣
— pg (@GotarneParag) March 3, 2023
रूको जरा सबर करो …
वक्त बदलता है जब बारी आपकी आयगी तब बता देंगे .
जेव्हा तुमच्या साहेबांच्या आनाखाली जाळ काढला, घरावर दगड, तेवढंच काय तर चप्पल पण मारल्या काय माहित नेमक्या कुठ कुठ किती लागल्या असतिल पण तेव्हा तुमच्या साहेबांच समर्थन म्हणून पहिला आवाज @RajThackeray साहेबांचा— शिवतीर्थ एक राजदरबार (@ODinesh1998) March 3, 2023
Join Our WhatsApp Community