रविवारपासून मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात भाजपा – शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी शनिवारी, ४ मार्च रोजी दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी, ५ मार्चपासून सुरू होत आहे. दीड-दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशाप्रकारे सहा यात्रा संपन्न होतील, अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
(हेही वाचा आता कपिल सिब्बल तिसऱ्या आघाडीसाठी घेणार पुढाकार; काय आहे अजेंडा?)
शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्य
शेलार म्हणाले, ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community