ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेच्यावतीने नवीन पुलाचे काम सुरु असताना मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे दिसून आले आहे. या गळती दुरुस्तीचे काम महानगरपालिकेतर्फे गुरुवार ९ ते ११ मार्च २०२३ रोजीच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के एवढी पाणीकपात केली जाणार आहे.
जलवाहिनी या दुरुस्ती कामामुळे गुरुवार ९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील ‘या’ परिसरांमध्ये पाणीकपात
पूर्व उपनगरे –
- टी विभागः मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग
- एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.
- एन विभागः विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
- एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग
- एम/पूर्व विभागः गोवंडी, देवनार, शिवाजी नगर आदी संपर्ण विभाग
- एम/पश्चिम विभागः चेंबूर, टिळक नगर अदी संपूर्ण विभाग
शहर विभाग –
- ए विभागः बीपीटी व नौदल परिसर
- बी विभागः मस्जिद बंदर, जे जे आदी संपूर्ण विभाग
- ई विभागः भायखळा, काळाचौंकी संपूर्ण विभाग
- एफ/दक्षिण विभागः लालबाग, परळ, शिवडी, संपूर्ण विभाग
- एफ/उत्तर विभागः शीव, वडाळा, अँटॉप हिल संपूर्ण विभाग