एमआयएमचे औरंग्यावरील प्रेम; औरंगाबादच्या नावासाठीच्या आंदोलनात औरंगजेबचा फोटो 

174

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केल्यानंतर एमआयएमने मुस्लिमांच्या भावना चेतवण्यासाठी या विषयाचे राजकारण सुरु केले आहे. यासाठी पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी चक्क जिल्ह्याचे औरंगाबाद हेच नाव ठेवण्यासाठी चक्क बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यासाठी त्या आंदोलनात चक्क औरंगजेबचा फोटो वापरण्यात आला. त्यामुळे एमआयएमचे औरंगजेबावरील प्रेम दिसून आले आहे.

एमआयएचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. यासाठी  जलील यांच्या आंदोलनात काही आंदोलकांनी थेट औरंगजेबाचा फोटो झळकावला. विशेष म्हणजे हा फोटो बराचवेळ आंदोलनात झळकावण्यात आला. पण कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. नंतर संबंधित प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित फोटो तिथून हटवण्यात आला. या प्रकारावर इम्तियाज जलील यांनी आपण त्या फोटोचे समर्थन करत नाही, असे म्हटले, पण एमआयएमकडून औरंगजेबाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतले होते. त्यावेळीदेखील महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते.

(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.