अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका! बुलढाणा, नंदूरबारसह धुळ्यात जोरदार पावसाला सुरूवात

162

राज्यात ४ ते ८ मार्चदरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळ्यामुळे पावसामुळे गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नंदूरबारमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे.

( हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून कॉपी; बारावी पेपर फुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह ५ जणांना अटक)

गारपीटीसह पावसाची शक्यता

या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलांमुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका तसेच आंबा आणि पालेभाज्यांच्या पिकाला मोठा फटका बसला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. राज्यात काही भागात गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर आणि विदर्भात ८ मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

नंदूरबारमधील तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशावर होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून तापमानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि हरभरा या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.