भाजपमध्ये आलेल्या कोणाची चौकशी बंद झाली ते दाखवा – देवेंद्र फडणवीस

192

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत ९ राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. याच पत्रावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंत्रणाचा गैरवापर होतोय, असं कुठेही होत नाहीये. तसंच भाजपमध्ये आलेल्या कोणत्या नेत्यांची चौकशी बंद झालीये हे दाखवा, असं आव्हान फडणवीसांना केलं आहे.

अमरावतीत प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला असं वाटतंय की, यंत्रणाचा गैरवापर होतोय, असं कुठेही होत नाहीये. मोदींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गानं पैसे कमवतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम वेगवेगळ्या तपास यंत्रणा करतायत. आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाहीये. त्यामुळे मला वाटतं नाही की, अशाप्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातून कोणाची सुटका होणार आहे. याच्यावरचा उपाय एवढाच आहे की, हा भ्रष्टाचार आणि गैर मार्गानं कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केलं पाहिजे.’

मात्र भाजपात आलेल्याच्या चौकशी बंद झाल्या आहेत या आरोपवर फडणवीस म्हणाले की, ‘असं त्यांनी एखादं उदाहरण दाखवावं की, भारतीय जनता पक्षामध्ये आलं म्हणून कोणाची चौकशी बंद झाली. कोणाची चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो. ज्यांनी चुक केलीय त्यांची चौकशी होईल. आणि एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल तर न्यायालय आहे. त्यासंदर्भात न्यायालय निश्चित न्याय देईल.’

(हेही वाचा – तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.