अंदमान आणि निकोबार बेटांवर सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निकोबार बेटांवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ५ रिश्टर स्केलवर याची तीव्रता मोजली गेली आहे. दरम्यान या भूकंपानंतर लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची अद्याप माहिती मिळाली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ मोजली गेली. निकोबार बेटांवर पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यापूर्वी शनिवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी आणि रविवारी जम्मू-काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भूकंप झाला होता. रविवारी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांदीपोरा जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खाली ३४.४२ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.८८ अंश पूर्व रेखांशावर होता. येथेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
(हेही वाचा – बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत 7 आरोपी अटकेत)
Join Our WhatsApp Community