स्विगी ही घरोघरी जेवणाची ऑर्डर पोहोचवणारी कंपनी कायम वादात सापडत असते, विशेषत: हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हे वाद निर्माण झाले आहेत. याआधीही हैद्राबाद येथे एका ग्राहकाकडे त्यांची जेवणाची ऑर्डर घेऊन मुस्लिम मुलाला पाठवल्याने त्याला त्या ग्राहकाने विरोध केला होता, आता स्विगीने होळीच्या दिवशी या सणाच्या साजरीकरणाविषयी अपप्रचार करणारी जाहिरात प्रसिद्ध करून नवा वाद निर्माण केला आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्री म्हणाले, सगळं विसरून होळीचा आनंद घ्या)
काय म्हटले आहे स्विगीने जाहिरातीत?
स्विगीने होळीच्या निमित्ताने ही जाहिरात दिली आहे, ज्यात स्विगीने म्हटले की, ‘अंडे ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे हाल्फ बॉईल ऑमलेट बनवण्यासाठी, अंडे कुणाच्या डोक्यात फोडण्यासाठी नाही.
काय म्हणतात नेटकरी?
या निमित्ताने नेटकऱ्यांनी स्विगी हिंदूंच्या सणाची बदनामी का करत आहे, अशी विचारणा केली आहे, काही नेटकऱ्यांनी स्विगीने अन्य धर्मियांनी कोणत्या शब्दांत त्यांच्या सणांना शुभेच्छा दिल्या होत्या याची आठवण करून दिली. स्विगीने हॅपी ख्रिसमस म्हटले, स्विगीने ईद मुबारक म्हटले मग हिंदूंच्या सणांची बदनामी का करत आहे, अशी विचारणा केली आहे.
https://twitter.com/AskAnshul/status/1632983420778446848?s=20
Spot the hypocrisy.#HinduPhobicSwiggy pic.twitter.com/zQgibZ5gMV
— Kreately.in (@KreatelyMedia) March 7, 2023
Hey @swiggy, it's not okay to give selective gyan on Hindu festivals. Your Holi reel & Billboard is creating a wrong perception about Holi. You must apologize and take steps to promote cultural inclusivity. #HinduPhobicSwiggy pic.twitter.com/5Wy7obS7BL
— Yogi Devnath 🇮🇳 (@MYogiDevnath) March 7, 2023
तर काहींनी नैसर्गिक रंगांमध्ये खेळली जात असलेल्या होळीचा फोटो ट्विट करून ‘इथे कुठे अंड्याचा वापर होतोय’, अशी विचारणा केली आहे.
I can see only Colours & Flowers.
Where are eggs @harshamjty ? Stop creating nuisance with my festival @Swiggy. #HinduPhobicSwiggy pic.twitter.com/9JSShpN8pS— Samrat Bhai (@BhaiiSamrat) March 7, 2023
तर काहींनी स्विगीचे ऍप काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp CommunityRetweet And Boycott #HinduPhobicSwiggy pic.twitter.com/Qp3pWxlzRL
— Harish Sharma (@Sharmaharishji) March 7, 2023