तुर्कीने काश्मीर मुद्यावरून भारताला केले लक्ष्य; सोशल मीडियात संताप, काय म्हणतात नेटकरी?

213

नुकताच तुर्कस्थानात भयंकर भूकंप आला तेव्हा २४ तासांत पहिली मदत पाठवणार भारत हा एकमेव देश होता. भारताने तुर्कस्थानला केवळ औषधे,  अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय वस्तू यांची मदत दिली नव्हती तर भूकंपग्रस्त पीडितांना वाचवण्यासाठी रेस्क्यू पथके पाठवली होती. या मदतीनंतर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला दोस्त म्हणून संबोधित केले, पण गरज सरो आणि वैद्य मरो, या उक्तीप्रमाणे तुर्कीने वर्तन केले आहे. याप्रकरणी सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. “Turkey No Dost” असा ट्विटर ट्रेंड होऊ लागला आहे.

(हेही वाचा जेव्हा सचिन तेंडुलकर त्याच्या ताटात काय आहे विचारतो, तेव्हा…)

काय आहे प्रकरण? 

नुकतेच संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत तुर्कस्थानाने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकाराचे हनन होत असल्याचे म्हटले आहे. याआधीही तुर्कस्थानाने काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानची पाठराखण करत भारताला टार्गेट केले होते.

काय म्हणतात नेटकरी? 

यानंतर आता ट्विटरवर Turkey No Dost” असा ट्विटर ट्रेंड होऊ लागला आहे. यात काही नेटकरी यांनी सापाला दूध पाजले तरी तो डसणारच, असे म्हटले आहे.

तर काही जणांनी सरकारला यातून धडा घ्यावा, असे सुचवले आहे.

काही जणांनी तर चीनसारखे धोरण राबवून तुर्कीच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकून त्याचे देशातच उत्पादन करावे, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.