मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असे सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार करत नाही, असे झाले तर आमदार निघून जातील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला.
अवकाळी पावसाने राज्याचे वाटोळ केले आहे. निसर्ग कधी कोपेल सांगता येत नाही, अशा वेळी आपण शेतकऱ्याच्या पाठिशी उभे रहायला पाहिजे, याबद्दल तर सरकार बोलायला तयार नाही. अशा पद्धतीचे सरकार आज सत्तेत आले आहे. त्यांना याबाबत विचारले तर ते फक्त म्हणतात आम्ही करु, आम्ही देऊ काही काळजी करु नका. परंतू निर्णय काही होत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला धारेवरही धरले.
(हेही वाचा तुर्कीने काश्मीर मुद्यावरून भारताला केले लक्ष्य; सोशल मीडियात संताप, काय म्हणतात नेटकरी?)
एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. पाच-सहा महिन्यात ५० कोटी रुपये जाहिरातीसाठी. मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेच फोटो. यांचाच उदोउदो. डबडी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community