कोईम्बतूर येथील मंदिरासमोर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिसने (खोरासान) स्वीकारली आहे. यानंतर भाजपने तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर निशाणा साधला आहे. ‘इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत’ ही अफगाणिस्तानातील इसिसची दहशतवादी संघटना आहे. संघटनेने आता भारतात रक्तपात आणि हल्ल्याची धमकी दिली आहे. आयएसकेपीच्या ‘व्हॉइस ऑफ खोरासान’ने या धमक्या दिल्या आहेत. या संघटनेची गणना ISIS च्या सर्वात घातक शाखांमध्ये केली जाते.
यावर प्रतिक्रिया देताना तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई म्हणाले, “इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या दहशतवादी संघटनेने कोईम्बतूर येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. डीएमकेचे नेते किमान आता झोपेतून जागे होतील आणि त्यांची ‘सिलींडर ब्लास्ट’ थिअरी थांबवतील. NIA या प्रकरणाचा तपास करत आहे. हा हिंदूंवर केलेला जिहादी हल्ला होता हे सर्वांसमोर स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार )
कर्नाटकातील मंगळुरू येथे असाच बॉम्बस्फोट झाला होता, ज्याची जबाबदारीही याच दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ISKP च्या ‘अल-अझीम मीडिया फाउंडेशन’च्या 68 पानांच्या मुखपत्राने भारतात रक्ताचे पाठ वाहण्याची धमकी दिली आहे. या बॉम्बस्फोटाद्वारे ‘आमच्या भावांनी बदला घेतला’, असे त्यांनी लिहिले आहे. एनआयएने फेब्रुवारीमध्ये या प्रकरणी दक्षिण भारतातील 40 ठिकाणी छापे टाकले होते. दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये सामाईक संबंध काय आहेत, याचा तपास सुरू आहे.
23 ऑक्टोबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेबाबत एनआयएने अनेकांना अटकही केली आहे. मंगळुरूमध्ये एका ऑटोरिक्षात स्फोट झाला, तर कोईम्बतूरमधील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर कारमध्ये स्फोट झाला. या हल्ल्यात जेमशा मुबीन नावाच्या हल्लेखोराचा मृत्यू झाला. आता ISKP ने हिंदू आणि भाजपचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. मुबीन मंगळुरू बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या शारिकलाही ओळखत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याची तार श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांशीही जोडलेली होती.
(हेही वाचा RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी; राहुल गांधी यांच्या वक्तव्याने नवा वाद)
Join Our WhatsApp Community